वाक्प्रचार


अर्थ, वाक्यातील उपयोग आणि संपूर्ण यादी



वाक्प्रचार म्हणजे काय?

मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार किंवा वाक्यप्रचार असे म्हणतात.

वाक्प्रचाराची काही वैशिष्ट्ये –

  • वाक्प्रचार हा एक विशिष्ट प्रकारचा शब्दसमूह असतो.
  • वाक्प्रचारातून निर्माण होणारा अर्थ हा त्याच्या मूळ अर्थापेक्षा भिन्न असतो.
  • मराठी भाषेमध्ये वाक्प्रचार हे फार पूर्वापार पासून रूढ झालेले आहेत. ते कधीपासून बोलीभाषेत आले हे कोणीही सांगू शकत नाही.
  • वाक्प्रचार हे मराठी भाषेमध्ये एक प्रकारचा गोडवा आणि झणझणीतपणासुद्धा आणतात.
  • वाक्प्रचारामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध झाली आहे असे म्हणता येईल.

मराठी व्याकरणातील वाक्प्रचार –

  1. अटकाव करणे
  2. अधीर होणे
  3. अपराध पोटात घेणे
  4. अपव्यय टाळणे
  5. अभाव असणे
  6. अवगत असणे
  7. अवहेलना होणे
  8. आकाशाला गवसणी घालणे
  9. आनंद गगनात न मावणे
  10. आभाळ कोसळणे
  11. आश्वासन देणे
  12. अंगवळणी पडणे
  13. अंगाचा तिळपापड होणे
  14. अंगात वीज संचारणे
  15. उत्कंठा वाढणे
  16. एकमत होणे
  17. कवेत घेणे
  18. कष्टी होणे
  19. कळी खुलणे
  20. काबाडकष्ट करणे
  21. काळजाला भिडणे
  22. कूच करणे
  23. केसाने गळा कापणे
  24. खटाटोप करणे
  25. खूणगाठ बांधणे
  26. खंड पडणे
  27. गलका करणे
  28. गवगवा होणे
  29. गावी नसणे
  30. चंग बांधणे
  31. जिवाचा आटापिटा करणे
  32. जीव खालीवर होणे
  33. जीव भांड्यात पडणे
  34. झळ लागणे
  35. झुंज देणे
  36. झोकून देणे
  37. डोळे भरून पाहणे
  38. दंग होणे
  39. धडकी भरणे
  40. धारातीर्थी पडणे
  41. धीर न सोडणे
  42. धूम ठोकणे
  43. नाक मुरडणे
  44. पर्वणी असणे
  45. पित्त खवळणे
  46. पोरके होणे
  47. बुचकळ्यात पडणे
  48. भगीरथ प्रयत्न करणे
  49. भान नसणे
  50. भीक न घालणे
  51. मन बसणे
  52. मरगळ झटकणे
  53. मात करणे
  54. ललकार घुमवणे
  55. वर्ज्य करणे
  56. विरजण पडणे
  57. शाश्वती नसणे
  58. सर्वस्व पणाला लावणे
  59. सुरूंग लावणे
  60. सोन्याचे दिवस येणे
  61. सोनेरी अक्षरात कोरणे
  62. संभ्रमात पडणे
  63. हट्टाला पेटणे
  64. हताश होणे
  65. हस्तगत करणे
  66. हेवा वाटणे
  67. हृदयाला साद घालणे
  68. होळी करणे

This article has been first posted on and last updated on by