बुचकळ्यात पडणे


वाक्प्रचाराचा अर्थ आणि वाक्यातील उपयोग



मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.

‘बुचकळ्यात पडणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ

  • गोंधळून जाणे
  • पेचात पडणे
  • समजेनासे होणे

वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १

सुशीलरावांनी कोणत्या पक्षात जायचे हे नक्की न केल्यामुळे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले.

वरील वाक्यात असे दिसते की सुशीलरावांनी कोणत्या पक्षात जायचे हे नक्की न केल्यामुळे कार्यकर्ते गोंधळून गेले किंवा त्यांना काय करावे हे समजेनासे झाले.

हे दर्शविण्यासाठी गोंधळून जाणे किंवा समजेनासे होणे या ऐवजी बुचकळ्यात पडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. २

काल अचानक फेसबुक बंद पडल्यामुळे फेसबुक वापरकर्ते बुचकळ्यात पडले.

वरील वाक्यात असे दिसते की काल अचानक फेसबुक बंद पडल्यामुळे फेसबुक वापरकर्ते गोंधळून गेले.

हे दर्शविण्यासाठी गोंधळून जाणे या ऐवजी बुचकळ्यात पडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. ३

इमारतीत अचानक पोलीस आल्यामुळे सर्व बुचकळ्यात पडले.

वरील वाक्यात असे दिसते की इमारतीत अचानक पोलीस आल्यामुळे सर्वांना काय करावे हे समजेनासे झाले.

हे दर्शविण्यासाठी समजेनासे होणे या ऐवजी बुचकळ्यात पडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. ४

सुनिताने लिहिलेला लेख दुसऱ्याच लेखकाच्या नावाने मासिकात प्रसिद्ध झाल्याने सुनिता बुचकळ्यात पडली.

वरील वाक्यात असे दिसते की सुनिताने लिहिलेला लेख दुसऱ्याच लेखकाच्या नावाने मासिकात प्रसिद्ध झाल्याने सुनिता पेचात पडली.

हे दर्शविण्यासाठी पेचात पडणे या ऐवजी बुचकळ्यात पडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

This article has been first posted on and last updated on by