दोन किंवा दोनापेक्षा अधिक अक्षरे एकत्र आल्यानंतर जर त्या अक्षरांच्या समूहाला निश्चित असा अर्थ प्राप्त होत असेल, तर त्या समूहाला शब्द असे म्हणतात.
याचाच अर्थ असा कि ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल, तर त्या समूहाला शब्द असे म्हणतात.
उदाहरणार्थ,
कमळ हा एक शब्द आहे.
चेहरा हा एक शब्द आहे.
पंकज हा एक शब्द आहे.
वस्तू हा एक शब्द आहे.
दर्शनीय हा एक शब्द आहे.
वरील उदाहरणांतील कमळ हा अक्षरांचा समूह जर मकळ असा लिहिला तर त्याला काहीच अर्थ प्राप्त होत नाही. त्यामुळे मकळ या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणता येणार नाही.
त्याचप्रमाणे चेहरा हा अक्षरांचा समूह जर हचेरा असा आला तर तो अर्थहीन होतो. त्यामुळे हचेरा या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणता येणार नाही.
अर्थपूर्ण शब्द
अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अक्षरांचा क्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.
शब्दाचा अर्थ समजण्यासाठी अक्षरं योग्य क्रमाने आली पाहिजेत.