About Us

आमच्याविषयी थोडेसे

एखाद्या भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्या भाषेचे व्याकरण समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्याकरणामुळे ती भाषा समजणे, तसेच त्या भाषेमध्ये स्वतःचे विचार योग्य प्रकारे व्यक्त करणे, अगदी सहज आणि सोपे होऊन जाते. मराठी भाषिकांना मराठी आणि इंग्रजी व्याकरण शिकणे सोपे व्हावे आणि त्यांना ते मराठी माध्यमातून शिकता यावे हा या संकेतस्थळाचा मुख्य हेतू आहे.

व्याकरण शिकणे सोपे व्हावे आणि ते समजेल अशा माध्यमातून शिकता यावे या हेतूने आम्ही व्याकरणातील विविध विषयांच्या संज्ञा आणि त्यांचे स्पष्टीकरण देत आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित लक्षात राहील आणि त्याचा वापर करणे अधिक सोपे होईल.