मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
“सोन्याचे दिवस येणे” हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- खूप चांगले दिवस येणे
- वाईट काळ सरणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
मक्याच्या पिकाला सोन्याचे दिवस आले आहेत.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की मक्याच्या पिकाला खूप चांगले दिवस आले आहेत. म्हणजेच त्याचे उत्पादन मूल्य चांगले आहे किंवा बाजारभाव चांगला मिळत आहे, असा शब्दशः अर्थ आहे.
हे दर्शविण्यासाठी या वाक्यात खूप चांगले दिवस येणे या ऐवजी सोन्याचे दिवस येणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
सध्या तर ऑनलाईन सोने खरेदीलाही सोन्याचे दिवस आले आहेत.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की सध्या ऑनलाईन सोने खरेदीला खूप चांगले दिवस आले आहेत.
हे दर्शविण्यासाठी या वाक्यात खूप चांगले दिवस येणे या ऐवजी सोन्याचे दिवस येणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
भारतातील प्राचीन भाषा असलेल्या संस्कृतला आता सोन्याचे दिवस आले आहेत.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की भारतातील प्राचीन भाषा असलेल्या संस्कृतला आता खूप चांगले दिवस आले आहेत. संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार झाला आहे.
हे दर्शविण्यासाठी या वाक्यात खूप चांगले दिवस येणे या ऐवजी सोन्याचे दिवस येणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ४
दिवाळी अन् दसऱ्याला झेंडूच्या फुलांना सोन्याचे दिवस येतात.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की दिवाळी अन् दसऱ्याला झेंडूच्या फुलांना खूप चांगले दिवस येतात. या काळात नेहमीपेक्षा खरेदी जास्त व भाव चांगला मिळतो. त्यामुळे पैसे चांगले मिळतात.
हे दर्शविण्यासाठी या वाक्यात खूप चांगले दिवस येणे या ऐवजी सोन्याचे दिवस येणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.