धीर न सोडणे


वाक्प्रचाराचा अर्थ आणि वाक्यातील उपयोगमराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.

“धीर न सोडणे” हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ

हिंमत न हारणे

वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १

कितीही वाईट परिस्थिती आली तरी माणसाने धीर सोडू नये.

वरील वाक्यामध्ये असे दिसते की कितीही वाईट परिस्थिती आली तरी माणसाने हिंमत हारू नये, असे सांगण्यात आले आहे.

हे दर्शविण्यासाठी हिंमत न हारणे या ऐवजी धीर न सोडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. २

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतही कोरोना योद्ध्यांनी धीर सोडला नाही.

वरील वाक्यामध्ये असे दिसते की कोरोनाची परिस्थिती गंभीर असूनदेखील कोरोना योद्धे हिंमत हारले नाहीत.

हे दर्शविण्यासाठी हिंमत न हारणे या ऐवजी धीर न सोडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. ३

विवेकच्या पर्यटन व्यवसायाला गेल्यावर्षी खूप तोटा झाला, तरीही त्याने धीर सोडला नाही.

वरील वाक्यामध्ये असे दिसते की विवेकच्या व्यवसायाला खूप तोटा होऊनदेखील तो हिंमत हारला नाही.

हे दर्शविण्यासाठी हिंमत न हारणे या ऐवजी धीर न सोडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

‘धीर न सोडणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे

  • पतीनिधनानंतरही सावित्रीने धीर सोडला नाही.

  • वादळाने मनिषाच्या घराचे खूप नुकसान झाले, पण तिने धीर सोडला नाही.

  • हिरकणी आपल्या मुलाला भेटण्यासाठी सगळा गड उतरली, पण तिने त्याही परिस्थितीत धीर सोडला नाही.

This article has been first posted on and last updated on by