मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘भीक न घालणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- पर्वा न करणे
- न जुमानता
- तमा न करणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
भारताने पाकिस्तानच्या कोणत्याही दबावाला भीक घातली नाही.
वरील वाक्यात असे दिसते की भारताने पाकिस्तानच्या कोणत्याही दबावाची पर्वा केली नाही.
हे दर्शविण्यासाठी पर्वा न करणे या ऐवजी भीक न घालणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
भारतीय खेळाडूंचे लक्ष विचलित करण्याचा प्रतिस्पर्धी संघाने खूप प्रयत्न केला. परंतु भारतीय खेळाडूंनी या गोष्टींना भीक घातली नाही.
वरील वाक्यात असे दिसते की भारतीय खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघाच्या लक्ष विचलित करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना जुमानले नाही किंवा त्याची पर्वा केली नाही.
हे दर्शविण्यासाठी पर्वा न करणे या ऐवजी भीक न घालणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
सुनिताने गुन्हेगारांच्या दबावाला भीक न घालता कोर्टात साक्ष दिली.
वरील वाक्यात असे दिसते की सुनिताने गुन्हेगारांच्या दबावाला न जुमानता किंवा पर्वा न करता कोर्टात साक्ष दिली.
हे दर्शविण्यासाठी पर्वा न करणे या ऐवजी भीक न घालणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ४
पत्रकारांनी सरकारच्या विरोधाला भीक न घालता बातमी छापली.
वरील वाक्यात असे दिसते की पत्रकारांनी सरकारच्या विरोधाला न जुमानता किंवा पर्वा न करता कोर्टात साक्ष दिली.
हे दर्शविण्यासाठी पर्वा न करणे या ऐवजी भीक न घालणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
‘भीक न घालणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
-
लिंडन जॉन्सन यांच्या धमकीला लाल बहादूर शास्त्रींनी भीक घातली नाही.
-
इंग्रज सरकारच्या विरोधाला भीक न घालता महात्मा गांधींनी सत्याग्रह चालूच ठेवला.
-
समरने येणाऱ्या अडचणींना भीक न घालता त्याचा प्रवास चालूच ठेवला.