मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
“कूच करणे” हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- पुढे जाणे
- कामगिरीवर निघणे
- मोहिमेवर निघणे
- कामावर निघणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
गिर्यारोहकांनी त्रिंगलवाडी गडाच्या दिशेने कूच केली.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की गिर्यारोहक त्रिंगलवाडी गडाच्या दिशेने पुढे निघाले आहेत.
हे दर्शविण्यासाठी या वाक्यात पुढे जाणे या ऐवजी कूच करणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
स्वराज्याची पूर्ण व्यवस्था करून छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयासाठी रायगडाहून कूच केले.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी रायगडाहून कामगिरीवर निघाले अथवा मोहिमेवर निघाले.
हे दर्शविण्यासाठी या वाक्यात कामगिरीवर निघणे किंवा मोहिमेवर निघणे या ऐवजी कूच करणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी येताच सर्व वारकऱ्यांनी त्या दिशेने कूच केली.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी येताच सर्व वारकरी त्या दिशेने पुढे गेले.
हे दर्शविण्यासाठी या वाक्यात पुढे जाणे या ऐवजी कूच करणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ४
यात्रेकरूंनी श्री क्षेत्र अमरनाथच्या दिशेने कूच केली.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की यात्रेकरू श्री क्षेत्र अमरनाथच्या दिशेने पुढे गेले.
हे दर्शविण्यासाठी या वाक्यात पुढे जाणे या ऐवजी कूच करणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.