मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘कागाळी करणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- तक्रार करणे
- चहाडी करणे
- गाऱ्हाणे सांगणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
मुलांनी वर्गशिक्षिकेकडे किरणची कागाळी केली.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की मुलांनी वर्गशिक्षिकेकडे किरणची तक्रार केली.
हे दर्शविण्यासाठी ‘तक्रार करणे’ याऐवजी ‘कागाळी करणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
सूनेने सगुणाबाईंकडे सासूची कागाळी केली.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की सूनेने सगुणाबाईंकडे सासूची चहाडी केली किंवा आपले गाऱ्हाणे सांगितले.
हे दर्शविण्यासाठी ‘चहाडी करणे’ किंवा ‘गाऱ्हाणे सांगणे’ याऐवजी ‘कागाळी करणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
‘कागाळी करणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
-
बाबा घरी आल्यावर सुमितने आईची कागाळी केली.
-
कार्यकर्त्यांनी किसनरावांकडे विरोधी पक्षाची कागाळी केली.
-
जे प्रामाणिकपणे आपले काम करतात ते कुणाची कागाळी करत नाहीत.