वाक्प्रचाराचा अर्थ
मराठी वाक्प्रचार 'मरगळ झटकणे'
मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.
'मरगळ झटकणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- आळस सोडणे
वाक्यातील उपयोग
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
- स्पर्धेची तयारी करण्यासाठी अविनाशने सगळी मरगळ झटकली.
वरील वाक्यात असे दिसते की स्पर्धेची तयारी करण्यासाठी अविनाशने सगळा आळस सोडला.
हे दर्शविण्यासाठी 'आळस सोडणे' याऐवजी 'मरगळ झटकणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
- सुनिता सगळी मरगळ झटकून घराची साफसफाई करायला लागली.
वरील वाक्यात असे दिसते की सुनीता सगळा आळस सोडून घराची साफसफाई करायला लागली.
हे दर्शविण्यासाठी 'आळस सोडणे' याऐवजी 'मरगळ झटकणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
'मरगळ झटकणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
- मुख्यमंत्री आपल्या गावी येणार हे कळताच प्रशासन सगळी मरगळ झटकून कामाला लागले.
- कोव्हिड काळातही डॉक्टर करत असलेले काम पाहून मी माझ्या मनातील मरगळ झटकून टाकली.
- छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा ऐकताच मी मनातील मरगळ झटकून कामाला सुरूवात केली.