मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
“कळी खुलणे” हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
आनंदित होणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
बाबांनी नवीन सायकल आणली हे बघताच रोहनची कळी खुलली.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की बाबांनी नवीन सायकल आणताच रोहनला खूप आनंद झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
हे दर्शविण्यासाठी आनंदित होणे ऐवजी कळी खुलणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
अपेक्षेपेक्षा चांगला निकाल लागल्यामुळे अमेयची कळी खुलली.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की अपेक्षेपेक्षा चांगला निकाल लागल्यामुळे अमेयला खूप आनंद झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
हे दर्शविण्यासाठी आनंदित होणे ऐवजी कळी खुलणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
रविवारी फिरायला जाणार हे कळताच रियाची कळी खुलली.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की रविवारी फिरायला जाणार रियाला खूप आनंद झाला आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
हे दर्शविण्यासाठी आनंदित होणे ऐवजी कळी खुलणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.