मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘ताव मारणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
मनसोक्त खाणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
श्रीकृष्णाने सुदाम्याने आणलेल्या पोह्यावर ताव मारला.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की श्रीकृष्णाने सुदाम्याने आणलेले पोहे मनसोक्त खाल्ले.
हे दर्शविण्यासाठी ‘मनसोक्त खाणे’ याऐवजी ‘ताव मारणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
आईने केलेल्या सुग्रास जेवणावर सगळ्यांनीच यथेच्छ ताव मारला.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की आईने केलेले सुग्रास जेवण सगळ्यांनीच मनसोक्त खाल्ले.
हे दर्शविण्यासाठी ‘मनसोक्त खाणे’ याऐवजी ‘ताव मारणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
‘ताव मारणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
-
रियाने गरमागरम पुरणपोळ्यांवर ताव मारला.
-
वसतिगृहामध्ये राहणाऱ्या अमेयने बऱ्याच दिवसांनंतर घरच्या जेवणावर ताव मारला.
-
अनिकेतने मांसाहारी जेवणावर ताव मारला.