मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘श्रीगणेशा करणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- आरंभ करणे
- सुरूवात करणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
अनिताने कथ्थक शिकण्याचा श्रीगणेशा केला.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की अनिताने कथ्थक शिकण्यास आरंभ केला.
हे दर्शविण्यासाठी ‘आरंभ करणे’ किंवा ‘सुरूवात करणे’ याऐवजी ‘श्रीगणेशा करणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
छोट्या स्वराने शैक्षणिक जीवनाचा श्रीगणेशा केला.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की छोट्या स्वराने शैक्षणिक जीवनास सुरूवात केली.
हे दर्शविण्यासाठी ‘आरंभ करणे’ किंवा ‘सुरूवात करणे’ याऐवजी ‘श्रीगणेशा करणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
‘श्रीगणेशा करणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
-
कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरूवात ही त्या कार्याचा श्रीगणेशा करूनच होते.
-
आईने दिवाळीच्या फराळाचा आजपासून श्रीगणेशा केला.
-
रोहितने स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचा श्रीगणेशा केला.