मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘पोटात आग पडणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
खूप भूक लागणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
खेळून आल्याने मुलांच्या पोटात आग पडली होती.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की खेळून आल्याने मुलांना खूप भूक लागली होती.
हे दर्शविण्यासाठी ‘खूप भूक लागणे’ याऐवजी ‘पोटात आग पडणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
किल्ला चढून आल्यानंतर सगळ्यांच्या पोटात आग पडली.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की किल्ला चढून आल्यानंतर सगळ्यांना खूप भूक लागली होती.
हे दर्शविण्यासाठी ‘खूप भूक लागणे’ याऐवजी ‘पोटात आग पडणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
‘पोटात आग पडणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
-
दिवाळीची साफसफाई करून सगळ्यांच्या पोटात आग पडली होती.
-
आईने पुरणपपोळ्या केल्या आहेत हे कळताच अमेयच्या पोटात आग पडली.
-
सुदाम्याचे पोहे श्रीकृष्ण असा काही खात होता की जणूकाही त्याच्या पोटात आगच पडली होती.