उत्कंठा वाढणे


वाक्प्रचाराचा अर्थ आणि वाक्यातील उपयोग



मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.

“उत्कंठा वाढणे” हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ

  • उत्सुकता वाढणे
  • कुतूहल वाढणे

वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १

आई पहिल्यांदाच विमानात बसणार होती, त्यामुळे तिची उत्कंठा वाढली.

वरील वाक्यामध्ये असे दिसते की आई पहिल्यांदाच विमानात बसणार असल्यामुळे तिचे कुतूहल वाढले.

हे दर्शविण्यासाठी कुतूहल वाढणे या ऐवजी उत्कंठा वाढणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. २

मैत्रिणींनी शिफारस केल्यामुळे ‘पावनखिंड’ हा चित्रपट बघण्याची माझी उत्कंठा वाढली.

वरील वाक्यामध्ये असे दिसते की मैत्रिणींनी शिफारस केल्यामुळे ‘पावनखिंड’ हा चित्रपट बघण्याची माझी उत्सुकता वाढली.

हे दर्शविण्यासाठी उत्सुकता वाढणे या ऐवजी उत्कंठा वाढणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. ३

चुरशीच्या स्पर्धेमध्ये कोण जिंकणार, हे जाणून घेण्याची सगळ्यांचीच उत्कंठा वाढली.

वरील वाक्यामध्ये असे दिसते की चुरशीच्या स्पर्धेमध्ये कोण जिंकणार हे जाणण्यासाठी सगळ्यांचेच कुतूहल वाढले.

हे दर्शविण्यासाठी कुतूहल वाढणे या ऐवजी उत्कंठा वाढणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. ४

‘राजा शिवछत्रपती’ हे पुस्तक वाचताना आमची उत्कंठा वाढली.

वरील वाक्यामध्ये असे दिसते की ‘राजा शिवछत्रपती’ हे पुस्तक वाचताना आमची उत्सुकता वाढली.

हे दर्शविण्यासाठी उत्सुकता वाढणे या ऐवजी उत्कंठा वाढणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

This article has been first posted on and last updated on by