मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘खटाटोप करणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
खूप प्रयत्न करणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
डब्याचे झाकण उघडण्यासाठी रूपेशने खूप खटाटोप केला.
वरील वाक्यात असे दिसते की डब्याचे झाकण उघडण्यासाठी रूपेशने खूप प्रयत्न केले.
हे दर्शविण्यासाठी खूप प्रयत्न करणे या ऐवजी खटाटोप करणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
पाण्यात पडलेली अंगठी शोधण्यासाठी राधाने खूप खटाटोप केला.
वरील वाक्यात असे दिसते की पाण्यात पडलेली अंगठी शोधण्यासाठी राधाने खूप प्रयत्न केले.
हे दर्शविण्यासाठी खूप प्रयत्न करणे या ऐवजी खटाटोप करणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
खूप खटाटोप करून वनविभागाने बिबट्यास पकडले.
वरील वाक्यात असे दिसते की खूप प्रयत्न करून वनविभागाने बिबट्यास पकडलेे.
हे दर्शविण्यासाठी खूप प्रयत्न करणे या ऐवजी खटाटोप करणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ४
शाळा नावारूपाला येण्यासाठी सावंत सरांनी खूप खटाटोप केला.
वरील वाक्यात असे दिसते की शाळा नावारूपाला येण्यासाठी सावंत सरांनी खूप प्रयत्न केले.
हे दर्शविण्यासाठी खूप प्रयत्न करणे या ऐवजी खटाटोप करणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.