वाक्प्रचाराचा अर्थ
मराठी वाक्प्रचार 'मात करणे'
मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.
'मात करणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- विजय मिळवणे
- सामना करणे
- वरचढ होणे
वाक्यातील उपयोग
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
- अभ्यास करताना विजयला अनेक संकटे आली, परंतु त्याने त्यावर मात करून यश मिळवले.
वरील वाक्यात असे दिसते की अभ्यास करताना विजयला अनेक संकटे आली, परंतु त्याने त्यांचा सामना केला.
हे दर्शविण्यासाठी 'सामना करणे' याऐवजी 'मात करणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
- शिक्षण घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनंत अडचणी आल्या, पण त्यावर त्यांनी मात केली.
वरील वाक्यात असे दिसते की शिक्षण घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आलेल्या अनंत अडचणींवर त्यांनी विजय मिळवला.
हे दर्शविण्यासाठी 'विजय मिळवणे' याऐवजी 'मात करणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
'मात करणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
- अपंगत्वावर मात करत अरुणिमा सिन्हा यांनी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले.
- प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आनंदाने जगले पाहिजे.
- कांचनने कर्करोगावर मात केली.