मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘झुंज देणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- लढणे
- लढा देणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
झाशीच्या राणीने ब्रिटीशांच्या बलाढ्य सत्तेशी कडवी झुंज दिली.
वरील वाक्यात असे दिसते की झाशीची राणी ब्रिटीशांच्या बलाढ्य सत्तेशी शेवटपर्यंत लढली.
हे दर्शविण्यासाठी लढणे या ऐवजी झुंज देणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
दोन वर्षांच्या मुलाने कोरोनाशी यशस्वी झुंज दिली.
वरील वाक्यात असे दिसते की दोन वर्षांच्या मुलाने कोरोना या भयंकर आजाराशी यशस्वी लढा दिला.
हे दर्शविण्यासाठी लढा देणे या ऐवजी झुंज देणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
हेमलताने वाघाशी झुंज देऊन बहिणीचे प्राण वाचवले.
वरील वाक्यात असे दिसते की हेमलताने वाघाशी लढून तिच्या बहिणीचे प्राण वाचवले.
हे दर्शविण्यासाठी लढा देणे या ऐवजी झुंज देणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ४
अपंगात्वर मात करून स्वातीने संकटांशी झुंज दिली.
वरील वाक्यात असे दिसते की अपंगात्वर मात करून स्वाती संकटांशी लढली.
हे दर्शविण्यासाठी लढणे या ऐवजी झुंज देणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.