मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
“खूणगाठ बांधणे” हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
दृढ निश्चय करणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
यावर्षी परीक्षेत पहिला क्रमांक मिळवायचा अशी ओमने खूणगाठ बांधली.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की परीक्षेत पहिला क्रमांक मिळवायचा असा ओमने दृढ निश्चय केला.
हे दर्शविण्यासाठी दृढ निश्चय करणे या ऐवजी खूणगाठ बांधणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
दोन महिन्यात नोकरी मिळवायचीच अशी किरणने मनाशी खूणगाठ बांधली.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की दोन महिन्यात नोकरी मिळवायचीच असा किरणने दृढ निश्चय केला.
हे दर्शविण्यासाठी दृढ निश्चय करणे या ऐवजी खूणगाठ बांधणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
लॉकडाऊनमध्ये एखादी नवीन कला शिकायची अशी रियाने खूणगाठ बांधली.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की लॉकडाऊनमध्ये एखादी नवीन कला शिकायची असा रियाने दृढ निश्चय केला.
हे दर्शविण्यासाठी दृढ निश्चय करणे या ऐवजी खूणगाठ बांधणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ४
किमान दहा किल्ले तरी यावर्षी सर करायचे अशी अभिजीतने मनाशी खूणगाठ बांधली.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की किमान दहा किल्ले तरी यावर्षी सर करायचे असा अभिजीतने दृढ निश्चय केला.
हे दर्शविण्यासाठी दृढ निश्चय करणे या ऐवजी खूणगाठ बांधणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ५
सैनिक होऊन देशाची सेवा करायची अशी अमेयने खूणगाठ बांधली.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की सैनिक होऊन देशाची सेवा करायची असा अमेयने दृढ निश्चय केला.
हे दर्शविण्यासाठी दृढ निश्चय करणे या ऐवजी खूणगाठ बांधणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.