मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘पोरके होणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
अनाथ होणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
आईवडिलांचे अपघातात अकाली निधन झाल्यामुळे मनीष पोरका झाला.
वरील वाक्यात असे दिसते की आईवडिलांचे अपघातात अकाली निधन झाल्यामुळे मनीष अनाथ झाला.
हे दर्शविण्यासाठी अनाथ होणे या ऐवजी पोरके होणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
कोरोनामुळे अनेक कुटुंब पोरकी झाली.
वरील वाक्यात असे दिसते की कोरोनामुळे (कुटुंबातील व्यक्तींचे निधन झाल्यामुळे) अनेक कुटुंब अनाथ झाली.
हे दर्शविण्यासाठी अनाथ होणे या ऐवजी पोरके होणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने सगळ्या भारतीयांना पोरके झाल्यासारखे वाटले.
वरील वाक्यात असे दिसते की स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने सगळ्या भारतीयांना अनाथ झाल्यासारखे वाटले.
हे दर्शविण्यासाठी अनाथ होणे या ऐवजी पोरके होणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ४
अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला.
वरील वाक्यात असे दिसते की अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाने महाराष्ट्र जणू अनाथ झाला.
हे दर्शविण्यासाठी अनाथ होणे या ऐवजी पोरके होणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.