वाक्प्रचाराचा अर्थ
मराठी वाक्प्रचार 'भगीरथ प्रयत्न करणे'
मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.
'भगीरथ प्रयत्न करणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- चिकाटीने प्रयत्न करणे
- खूप प्रयत्न करणे
वाक्यातील उपयोग
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
- कोविड काळात डॉक्टरांनी भगीरथ प्रयत्न करून रूग्णांचे प्राण वाचवले.
वरील वाक्यात असे दिसते की कोविड काळात डॉक्टरांनी चिकाटीने प्रयत्न करून रूग्णांचे प्राण वाचवले.
हे दर्शविण्यासाठी 'चिकाटीने प्रयत्न करणे' याऐवजी 'भगीरथ प्रयत्न करणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
- लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनिलने भगीरथ प्रयत्न केले.
वरील वाक्यात असे दिसते की लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनिलने खूप प्रयत्न केले.
हे दर्शविण्यासाठी 'खूप प्रयत्न करणे' याऐवजी 'भगीरथ प्रयत्न करणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
'भगीरथ प्रयत्न करणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
- व्यसनांच्या आहारी गेलेल्या रमेशला त्याच्या मित्रांनी भगीरथ प्रयत्न करून त्यातून बाहेर काढले.
- जुनं घर वाचवण्यासाठी सुमनने भगीरथ प्रयत्न केले.
- महापूरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने भगीरथ प्रयत्न केले.