हस्तगत करणे

वाक्प्रचाराचा अर्थ आणि वाक्यातील उपयोग

'हस्तगत करणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ

मराठी वाक्प्रचार 'हस्तगत करणे'

मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.

'हस्तगत करणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ
  • ताब्यात घेणे
  • काबीज करणे
  • मिळवणे
  • जिंकणे
वाक्यातील उपयोग

वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १
  • पोलिसांनी चोरांकडून सर्व माल हस्तगत केला.

वरील वाक्यात असे दिसते की पोलिसांनी चोरांकडून चोरीला गेलेला सर्व माल ताब्यात घेतला.

हे दर्शविण्यासाठी 'ताब्यात घेणे' याऐवजी 'हस्तगत करणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. २
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी करताना प्रथमतः तोरणा किल्ला हस्तगत केला.

वरील वाक्यात असे दिसते की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी करताना प्रथमतः तोरणा किल्ला जिंकला किंवा काबीज केला.

हे दर्शविण्यासाठी 'जिंकणे' किंवा 'काबीज करणे' याऐवजी 'हस्तगत करणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

'हस्तगत करणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे

  • पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीकडून दोन लाख रूपये हस्तगत केले.
  • बेळगावच्या राजश्री यांनी अखिल भारतीय सौंदर्य स्पर्धेचा किताब हस्तगत केला.
हताश होणे हेवा वाटणे

This educational article was first posted on and last updated on by