मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘थक्क होणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
आश्चर्य वाटणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
शर्विकाने लहान वयातच १०० किल्ले सर केले आहेत, हे समजताच अलिबागकर थक्क झाले.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की शर्विकाने लहान वयातच १०० किल्ले सर केले आहेत, हे समजताच अलिबागकरांना आश्चर्य वाटले.
हे दर्शविण्यासाठी ‘आश्चर्य वाटणे’ याऐवजी ‘थक्क होणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
छोट्या विधिराचे कथ्थक नृत्य बघून प्रेक्षक थक्क झाले.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की छोट्या विधिराचे कथ्थक नृत्य बघून प्रेक्षकांना आश्चर्य वाटले.
हे दर्शविण्यासाठी ‘आश्चर्य वाटणे’ याऐवजी ‘थक्क होणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
‘थक्क होणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
-
‘वीर जवान’ हा चित्रपट पाहताना प्रेक्षक थक्क झाले.
-
परागबुवांचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास आणि त्यातील सूक्ष्म अर्थाचे बारकावे बघून मी थक्क झाले.