मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
“काळजाला भिडणे” हा मराठी भाषेतील एक वाक्यप्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- मनापर्यंत पोचणे
- हृदयाला साद घालणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
लतादीदींची गाणी ही काळजाला भिडतात.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की लतादीदींची गाणी मनापर्यंत पोचणारी असतात.
हे दर्शविण्यासाठी मनापर्यंत पोचणे याऐवजी काळजाला भिडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
सुरेश भटांच्या कविता या थेट काळजाला भिडतात.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की सुरेश भटांच्या कविता थेट हृदयाला साद घालणाऱ्या असतात.
हे दर्शविण्यासाठी हृदयाला साद घालणे याऐवजी काळजाला भिडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
श्यामची आई हे सानेगुरुजींचे पुस्तक थेट काळजाला भिडते.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की श्यामची आई हे सानेगुरुजींचे पुस्तक हे थेट हृदयाला साद घालणारे आहे.
हे दर्शविण्यासाठी हृदयाला साद घालणे याऐवजी काळजाला भिडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ४
दत्तक घेतलेल्या किरणने जेव्हा मला पहिल्यांदा आई अशी हाक मारली, तेव्हा ती हाक माझ्या काळजाला भिडली.
वरील वाक्यामध्ये असे लक्षात येते की दत्तक घेतलेल्या किरणने जेव्हा कर्त्याला पहिल्यांदा आई अशी हाक मारली, तेव्हा त्या हाकेने कर्त्याच्या हृदयाला साद घातली.
हे दर्शविण्यासाठी हृदयाला साद घालणे याऐवजी काळजाला भिडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ५
नवख्या कलाकाराने वठवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका थेट काळजाला भिडली.
वरील वाक्यामध्ये असे लक्षात येते की नवख्या कलाकाराने वठवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका हृदयाला साद घालणारी होती किंवा मनापर्यंत पोचली.
हे दर्शविण्यासाठी हृदयाला साद घालणे किंवा मनापर्यंत पोचणे याऐवजी काळजाला भिडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.