भान नसणे


वाक्प्रचाराचा अर्थ आणि वाक्यातील उपयोग



मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.

‘भान नसणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ

जाणीव नसणे

वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १

आईवडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट केलेत याचे मुलांना भान नसते.

वरील वाक्यात असे दिसते की आईवडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट केलेत याची मुलांना जाणीव नसते.

हे दर्शविण्यासाठी जाणीव नसणे या ऐवजी भान नसणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. २

राहुल चित्र काढायला बसल्यावर त्याला वेळेचे भान नसते.

वरील वाक्यात असे दिसते की राहुल चित्र काढायला बसल्यावर त्याला वेळेची जाणीव नसते.

हे दर्शविण्यासाठी जाणीव नसणे या ऐवजी भान नसणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. ३

सुनीता रांगोळी काढण्यात इतकी रमली की तिला घरी जायचे भान राहिले नाही.

वरील वाक्यात असे दिसते की सुनीता रांगोळी काढताना तिला घरी जायचे आहे याची जाणीव राहिली नाही.

हे दर्शविण्यासाठी जाणीव नसणे या ऐवजी भान नसणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

‘भान नसणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे

  • भक्तमंडळी विठ्ठलनामात इतकी दंग झाली की त्यांना स्थळ-काळाचे भान राहिले नाही.

  • गीतरामायण ऐकताना आईला वेळेचे भान राहिले नाही.

This article has been first posted on and last updated on by