मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘अवगत असणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- माहिती असणे
- ज्ञात असणे
- आकलन होणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
हजारो वर्ष उलटल्यावर मानवाला लेखनकला अवगत झाली.
वरील वाक्यात असे दिसते की हजारो वर्ष उलटल्यावर मानवाला लिहिण्याची कला ज्ञात झाली किंवा माहिती झाली.
हे दर्शविण्यासाठी माहिती होणे या ऐवजी अवगत असणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
सुनीलला सायकल येत असल्याने दुचाकी चालवण्याची कला लवकरच अवगत झाली.
वरील वाक्यात असे दिसते की सुनीलला सायकल येत असल्याने दुचाकी कशी चालवावी याचे आकलन लवकर झाले.
हे दर्शविण्यासाठी आकलन होणे या ऐवजी अवगत असणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
आदिवासी शेतकऱ्यांना वारली चित्रकला अवगत आहे.
वरील वाक्यात असे दिसते की आदिवासी शेतकऱ्यांना वारली चित्रकला ज्ञात आहे किंवा माहिती आहे.
हे दर्शविण्यासाठी माहिती असणे या ऐवजी अवगत असणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ४
बिकट परिस्थितीतून मार्ग काढून आनंदाने जगण्याची कला सरिताला चांगलीच अवगत आहे.
वरील वाक्यात असे दिसते की बिकट परिस्थितीतून मार्ग काढून आनंदाने कसे जगावे हे सरिताला चांगलेच ज्ञात आहे किंवा माहिती आहे.
हे दर्शविण्यासाठी माहिती असणे या ऐवजी अवगत असणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.