मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘संभ्रमात पडणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- गोंधळात पडणे
- निर्णय घेता न येणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव कसा साजरा करावा याबाबत गणेशोत्सव मंडळे संभ्रमात पडली.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव कसा साजरा करावा याबाबत गणेशोत्सव मंडळे गोंधळात पडली होती किंवा त्यांना त्याबाबत कोणताही निर्णय घेता आला नाही.
हे दर्शविण्यासाठी गोंधळात पडणे या ऐवजी संभ्रमात पडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
सुस्थितीत असलेली बँक अचानक डबघाईला गेल्यामुळे खातेदार संभ्रमात पडले.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की सुस्थितीत असलेली बँक अचानक डबघाईला गेल्यामुळे खातेदार गोंधळात पडले किंवा त्यांना आता काय करावे याबाबत कोणताही निर्णय घेता आला नाही.
हे दर्शविण्यासाठी गोंधळात पडणे या ऐवजी संभ्रमात पडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
गाण्याच्या कार्यक्रमाला क्षमतेपेक्षा जास्त श्रोते आल्यामुळे आयोजक संभ्रमात पडले.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की गाण्याच्या कार्यक्रमाला क्षमतेपेक्षा जास्त श्रोते आल्यामुळे आयोजक गोंधळात पडले किंवा त्यांना नियोजन कसे करावे याबाबत कोणताही निर्णय घेता आला नाही.
हे दर्शविण्यासाठी गोंधळात पडणे या ऐवजी संभ्रमात पडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ४
साखरेच्या डब्यात छोट्या दिनूने तांदूळ एकत्र केल्याने ते वेगळे कसे करायचे या संभ्रमात आई पडली.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की साखरेच्या डब्यामध्ये तांदूळ एकत्र केल्याने ते वेगळे कसे करायचे याबाबत आई गोंधळात पडली.
हे दर्शविण्यासाठी गोंधळात पडणे या ऐवजी संभ्रमात पडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ५
किल्ल्यावर असलेले जुने मंदिर सापडत नसल्याने आम्ही संभ्रमात पडलो.
वरील वाक्यामध्ये असे दिसते की किल्ल्यावर असलेले जुने मंदिर सापडत नसल्याने आम्ही गोंधळात पडलो किंवा ते कसे शोधायचे याबाबत आम्हाला कोणताही निर्णय घेता आला नाही.
हे दर्शविण्यासाठी गोंधळात पडणे या ऐवजी संभ्रमात पडणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.