मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘पर्वणी असणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- आनंदमय काळ असणे
- सुवर्णसंधी असणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
ऑलिम्पिक सामने पाहणे आमच्यासाठी एक पर्वणीच असते.
वरील वाक्यात असे दिसते की ऑलिम्पिक सामने पाहणे आमच्यासाठी एक सुवर्णसंधी असते किंवा आनंदमय काळ असतो.
हे दर्शविण्यासाठी आनंदमय काळ असणे या ऐवजी पर्वणी असणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
गंधर्व महोत्सव ही पुणेकरांसाठी एक पर्वणी असते.
वरील वाक्यात असे दिसते की गंधर्व महोत्सव ही पुणेकरांसाठी एक सुवर्णसंधी असते किंवा आनंदमय काळ असतो.
हे दर्शविण्यासाठी आनंदमय काळ असणे या ऐवजी पर्वणी असणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
आजीच्या हातचा स्वयंपाक ही माझ्यासाठी पर्वणीच आहे.
वरील वाक्यात असे दिसते की आजीच्या हातचा स्वयंपाक खाणे हा कर्त्यासाठी एक आनंदमय काळ असतो.
हे दर्शविण्यासाठी आनंदमय काळ असणे या ऐवजी पर्वणी असणे या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
‘पर्वणी असणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
-
क्रिकेटचे सामने प्रत्यक्ष पाहणे ही क्रिकेट प्रेमींसाठी एक पर्वणीच असते.
-
मराठीतील विपुल साहित्यसंपदा ही मराठी वाचकांसाठी पर्वणी आहे.
-
साड्यांची खरेदी ही स्त्रियांसाठी एक पर्वणीच असते.