वाक्प्रचार म्हणजे काय?
मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार किंवा वाक्यप्रचार असे म्हणतात.
वाक्प्रचाराची काही वैशिष्ट्ये –
- वाक्प्रचार हा एक विशिष्ट प्रकारचा शब्दसमूह असतो.
- वाक्प्रचारातून निर्माण होणारा अर्थ हा त्याच्या मूळ अर्थापेक्षा भिन्न असतो.
- मराठी भाषेमध्ये वाक्प्रचार हे फार पूर्वापार पासून रूढ झालेले आहेत. ते कधीपासून बोलीभाषेत आले हे कोणीही सांगू शकत नाही.
- वाक्प्रचार हे मराठी भाषेमध्ये एक प्रकारचा गोडवा आणि झणझणीतपणासुद्धा आणतात.
- वाक्प्रचारामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध झाली आहे असे म्हणता येईल.
मराठी व्याकरणातील वाक्प्रचार –
- अटकाव करणे
- अधीर होणे
- अपव्यय टाळणे
- अभाव असणे
- अवगत असणे
- अवहेलना होणे
- आकाशाला गवसणी घालणे
- आनंद गगनात न मावणे
- आभाळ कोसळणे
- आश्वासन देणे
- अंगवळणी पडणे
- अंगाचा तिळपापड होणे
- अंगात वीज संचारणे
- उत्कंठा वाढणे
- एकमत होणे
- कवेत घेणे
- कष्टी होणे
- कळी खुलणे
- काबाडकष्ट करणे
- काळजाला भिडणे
- कूच करणे
- केसाने गळा कापणे
- खटाटोप करणे
- खूणगाठ बांधणे
- खंड पडणे
- गलका करणे
- गवगवा होणे
- गावी नसणे
- चंग बांधणे
- जिवाचा आटापिटा करणे
- जीव खालीवर होणे
- जीव भांड्यात पडणे
- झळ लागणे
- झुंज देणे
- झोकून देणे
- डोळे भरून पाहणे
- दंग होणे
- धडकी भरणे
- धारातीर्थी पडणे
- धीर न सोडणे
- धूम ठोकणे
- नाक मुरडणे
- पर्वणी असणे
- पोरके होणे
- बुचकळ्यात पडणे
- भगीरथ प्रयत्न करणे
- भान नसणे
- भीक न घालणे
- मन बसणे
- मरगळ झटकणे
- मात करणे
- ललकार घुमवणे
- वर्ज्य करणे
- विरजण पडणे
- शाश्वती नसणे
- सर्वस्व पणाला लावणे
- सुरूंग लावणे
- सोन्याचे दिवस येणे
- संभ्रमात पडणे
- हट्टाला पेटणे
- हताश होणे
- हस्तगत करणे
- हेवा वाटणे