शब्दांच्या जाती – विषय सूची
‘शब्दांच्या जाती’ म्हणजे काय?
मराठी भाषा ही वाक्यांपासून बनते, तर वाक्य हे विविध शब्दांपासून बनते.
हे शब्द अगणित असल्यामुळे त्यांचा अभ्यास करणे सोपे आणि सोयीचे व्हावे म्हणून मराठी भाषेत शब्दांचे एकूण आठ भाग केलेले आहेत. या भागांना शब्दांच्या जाती असे म्हणतात.
शब्दांच्या जाती माहित असल्यास वाक्यरचना सुलभ होते आणि वेगवेगळ्या शब्दांतील फरक समजण्यास मदत होते.
शब्दांच्या आठ जाती
- मराठी वाक्यात जे शब्द येतात, त्यांची कार्य ही वेगवेगळ्या प्रकारची असतात.
- शब्दांच्या वाक्यातील कार्यावरून त्यांना विविध नावे देण्यात आली आहेत.
- मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या पुढीलप्रमाणे आठ जाती आहेत –
-
- नाम
- सर्वनाम
- विशेषण
- क्रियापद
- क्रियाविशेषण अव्यय
- शब्दयोगी अव्यय
- उभयान्वयी अव्यय
- केवलप्रयोगी अव्यय
विकारी आणि अविकारी शब्द
- मराठी व्याकरणामध्ये ज्या शब्दाच्या स्वरूपात लिंग, वचन, विभक्ती याप्रमाणे बदल होतो, त्यास ‘विकारी शब्द’ म्हणजेच ‘सव्यय’ असे म्हणतात.
- तसेच, ज्या शब्दाच्या स्वरूपात लिंग, वचन, विभक्ती याप्रमाणे बदल होत नाही, त्यास ‘अविकारी शब्द’ म्हणजेच ‘अव्यय’ असे म्हणतात.

मराठी भाषेतील शब्दांच्या जाती
मराठी भाषेतील शब्दांच्या आठ जाती पुढीलप्रमाणे आहेत.
१. नाम
‘नाम’ म्हणजे असा शब्द की जो एखादी व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणासंबंधी वापरला जातो. नामाचे एकूण तीन मुख्य प्रकार पडतात.
२. सर्वनाम
नामाऐवजी जो शब्द वापरला जातो, त्याला ‘सर्वनाम’ असे म्हणतात. सर्वनामाचे एकूण सहा मुख्य प्रकार पडतात.
३. विशेषण
नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ‘विशेषण’ असे म्हणतात. विशेषणाचे एकूण तीन मुख्य प्रकार पडतात.
४. क्रियापद
जो शब्द वाक्यातील क्रिया दर्शवतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, त्या शब्दाला ‘क्रियापद’ असे म्हणतात.
५. क्रियाविशेषण अव्यय
जो शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो, त्या शब्दाला ‘क्रियाविशेषण अव्यय’ असे म्हणतात.
क्रियाविशेषण अव्ययाविषयी अधिक माहिती वाचा
संख्यावाचक/परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय
६. शब्दयोगी अव्यय
नामाचा किंवा सर्वनामाचा इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शविण्यासाठी त्याला जोडून वापरला जाणारा शब्द म्हणजे ‘शब्दयोगी अव्यय’ होय.
७. उभयान्वयी अव्यय
दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्ये एकमेकांना जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो, त्याला ‘उभयान्वयी अव्यय’ असे म्हणतात.
८. केवलप्रयोगी अव्यय
एखादी भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला ‘केवलप्रयोगी अव्यय’ असे म्हणतात.