प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय?
मराठी वाक्यामधील जे क्रियाविशेषण वाक्याला प्रश्नाचे स्वरूप प्राप्त करून देते, त्याला प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
तू आमच्याकडे जेवायला येशील का?
या वाक्यामध्ये का चा उपयोग क्रियाविशेषण अव्यय म्हणून केलेला आहे.
का च्या वाक्यातील उपयोगामुळे या वाक्याला प्रश्नाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
त्यामुळे, का या शब्दाला प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरण क्र. २
तुझ्याकडे दोन पेन आहेत ना?
या वाक्यामध्ये ना चा उपयोग क्रियाविशेषण अव्यय म्हणून केलेला आहे.
ना च्या वाक्यातील उपयोगामुळे या वाक्याला प्रश्नाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
त्यामुळे, ना या शब्दाला प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरण क्र. ३
तुम्ही उद्या गावाला जाणार आहात का?
या वाक्यामध्ये का चा उपयोग क्रियाविशेषण अव्यय म्हणून केलेला आहे.
का च्या वाक्यातील उपयोगामुळे या वाक्याला प्रश्नाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
त्यामुळे, का या शब्दाला प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरण क्र. ४
आज संध्याकाळी तू फिरायला येशील ना?
या वाक्यामध्ये ना चा उपयोग क्रियाविशेषण अव्यय म्हणून केलेला आहे.
ना च्या वाक्यातील उपयोगामुळे या वाक्याला प्रश्नाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
त्यामुळे, ना या शब्दाला प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरण क्र. ५
सगळं सामान घेऊन यायला जमेल ना?