विशेषण म्हणजे काय?


विशेषणाचे विविध प्रकार



विशेषण म्हणजे काय?

नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

अमोलकडे काळा कुत्रा आहे.

या वाक्यामध्ये कुत्रा कसा आहे, याबद्दल विशेष माहिती देण्यात आली आहे.

कुत्रा या नामाबद्दल विशेष माहिती देण्यासाठी काळा हे विशेषण वापरण्यात आले आहे.

उदाहरण क्र. २

रोहिणी ही एक हुशार विद्यार्थिनी आहे.

या वाक्यामध्ये रोहिणी कशी विद्यार्थिनी आहे, याबद्दल विशेष माहिती देण्यात आली आहे.

विद्यार्थिनी या नामाबद्दल विशेष माहिती देण्यासाठी हुशार हे विशेषण वापरण्यात आले आहे.

उदाहरण क्र. ३

विवेकचं पाठांतर उत्तम आहे.

या वाक्यामध्ये विवेकचं पाठांतर कसं आहे, याबद्दल विशेष माहिती देण्यात आली आहे.

पाठांतर या नामाबद्दल विशेष माहिती देण्यासाठी उत्तम हे विशेषण वापरण्यात आले आहे.

विशेषणाचे प्रकार

मराठी व्याकरणामध्ये विशेषणाचे पुढीलप्रमाणे तीन मुख्य प्रकार आहेत.

१. गुणवाचक विशेषण

एखाद्या नामाचा विशेष गुण दर्शविण्यासाठी या विशेषणाचा उपयोग केला जातो

अधिक माहिती

२. संख्यावाचक विशेषण

एखाद्या नामाची संख्या दर्शविण्यासाठी या विशेषणाचा उपयोग केला जातो

अधिक माहिती

३. सार्वनामिक विशेषण

एखाद्या सर्वनामापासून हे विशेषण तयार होते

अधिक माहिती

This article has been first posted on and last updated on by