'संख्यावाचक विशेषण' म्हणजे काय?
'संख्यावाचक विशेषण' म्हणजे काय?
मराठी वाक्यामध्ये एखाद्या नामाची संख्या दर्शविण्यासाठी ज्या विशेषणाचा उपयोग केला जातो, त्याला 'संख्यावाचक विशेषण' असे म्हणतात.
काही संख्यावाचक विशेषणे
मराठी व्याकरणातील काही संख्यावाचक विशेषणे -
| पहिला | दुसरा | शंभर | सात |
| चौपट | दुप्पट | काही | खूप |
संख्यावाचक विशेषणाचे प्रकार
संख्यावाचक विशेषणाचे प्रकार
संख्यावाचक विशेषणाचे पुढीलप्रमाणे एकूण 'पाच' पोटप्रकार आहेत.
१. क्रमवाचक संख्याविशेषण
क्रमवाचक संख्याविशेषणाने वस्तू किंवा व्यक्ती यांच्या क्रमांकाचा बोध होतो.
उदाहरणार्थ - पहिला, दुसरा, तिसरा, दहावा इत्यादी.
क्रमवाचक संख्याविशेषणाविषयी अधिक माहिती
२. गणनावाचक संख्याविशेषण
गणनावाचक संख्याविशेषणाने वस्तू किंवा व्यक्ती यांची मोजणी करता येते.
उदाहरणार्थ - सात, पन्नास, शंभर, पाचशे इत्यादी.
गणनावाचक संख्याविशेषणाविषयी अधिक माहिती
३. आवृत्तीवाचक संख्याविशेषण
आवृत्तीवाचक संख्याविशेषणाने संख्येची आवृत्ती किती वेळा झाली आहे हे कळते.
उदाहरणार्थ - दुप्पट, तिप्पट, चौपट, दहापट इत्यादी.
आवृत्तीवाचक संख्याविशेषणाविषयी अधिक माहिती
४. पृथकवाचक संख्याविशेषण
पृथकवाचक संख्याविशेषणाने वापरलेल्या शब्दाच्या अर्थामधून एका वेगळ्याच अर्थाचा बोध होतो.
उदाहरणार्थ - एक-एक, दोन-दोन, तीन-तीन इत्यादी.
\
पृथकवाचक संख्याविशेषणाविषयी अधिक माहिती
५. अनिश्चित संख्याविशेषण
अनिश्चित संख्याविशेषणाने नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही.
उदाहरणार्थ - खूप, भरपूर, थोडेसे, काही इत्यादी.