अनिश्चित विशेषण म्हणजे काय?
ज्या संख्याविशेषणाने एखाद्या नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही, त्या संख्याविशेषणाला अनिश्चित विशेषण असे म्हणतात.
मराठी व्याकरणातील काही अनिश्चित विशेषणे –
खूपभरपूरथोडंसंकाही
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
ओमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी भरपूर खेळणी भेट म्हणून मिळाली.
या वाक्यामध्ये ओमला किती खेळणी मिळाली, हे दर्शविण्यासाठी भरपूर हे अनिश्चित विशेषण वापरलेले आहे.
भरपूर या संख्याविशेषणाने निश्चित संख्येचा बोध होत नसल्यामुळे त्याला अनिश्चित विशेषण असे म्हणतात.
उदाहरण क्र. २
काही मुले वर्गामध्ये दंगा करतात.
या वाक्यामध्ये वर्गामध्ये किती मुले दंगा करतात, हे दर्शविण्यासाठी काही हे अनिश्चित विशेषण वापरलेले आहे.
काही या संख्याविशेषणाने निश्चित संख्येचा बोध होत नसल्यामुळे त्याला अनिश्चित विशेषण असे म्हणतात.
उदाहरण क्र. ३
मला थोडेसे तांदूळ हवे आहेत.
या वाक्यामध्ये किती तांदूळ हवे आहेत, हे दर्शविण्यासाठी थोडेसे हे अनिश्चित विशेषण वापरलेले आहे.
थोडेसे या संख्याविशेषणाने निश्चित संख्येचा बोध होत नसल्यामुळे त्याला अनिश्चित विशेषण असे म्हणतात.