'नाम' म्हणजे काय?
नाम म्हणजे काय?
एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते, त्याला 'नाम' असे म्हणतात.
डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या आणि गुणांच्या नावांनासुद्धा 'नाम' असे म्हणतात.
उदाहरणार्थ - वेदांत, कैलास, रामायण, कोबी, नांदेड, अयोध्या, दिवाळी, गुलाब, मोगरा, राधिका, प्रयागराज, धनश्री, चेंडू, गंगा
नामाचे प्रकार
नामाचे प्रकार
मराठी व्याकरणामध्ये नामाचे एकूण 'तीन' मुख्य प्रकार आहेत.
१. सामान्यनाम
एकाच जातीच्या पदार्थाच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला 'सामान्यनाम' दिले जाते. त्याचे बहुदा अनेकवचन होते.
सर्वसाधारण जातीचा, वर्गाचा किंवा प्रकाराचा उल्लेख करणारे नाव.
उदाहरणार्थ - मुलगा, मुलगी, घर, शाळा, नदी, दूध, मांजर, पाणी, पर्वत इत्यादी.
२. विशेषनाम
'विशेषनाम' हे नेहमी व्यक्तीवाचक असते. विशेषनामाचे कधीही अनेकवचन होत नाही.
एखाद्या विशिष्ट व्यक्ती, स्थळ, वस्तू, प्राणी यांचे नाव.
उदाहरणार्थ - राम, भीम, गंगा, हिमालय, गोदावरी, सचिन, रायगड, नर्मदा इत्यादी.
३. भाववाचक नाम
'भाववाचक नाम' म्हणजे असे नाम, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही किंवा डोळ्यांनी बघू शकत नाही.
भावना, गुण, अवस्था, स्थिती यांचे दर्शन होते.
उदाहरणार्थ - उत्तम, मनोहारी, आनंद, अहंकार, देवत्व, सुख, दुःख इत्यादी.