विशेषनाम म्हणजे काय?
ज्या नामातून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होतो, त्या नामाला विशेषनाम असे म्हणतात.
नियम क्र. १
विशेषनाम हे नेहमी व्यक्तीवाचक असते. विशेषनामामुळे जातीचा किंवा प्रकाराचा बोध न होता त्या जातीतील एखादी विशिष्ट व्यक्ती, वस्तू, प्राणी इत्यादींचा अर्थबोध होतो.
नियम क्र. २
विशेषनाम हे व्यक्तीवाचक असल्यामुळे त्याचे कधीही अनेकवचन होत नाही.
विशेषनामाची काही उदाहरणे –
रामभीमगंगाहिमालयमुंबईसचिनगोदावरीलंडनरायगडदिल्लीराजेशनर्मदा