'क्रमवाचक विशेषण' म्हणजे काय?
'क्रमवाचक विशेषण' म्हणजे काय?
ज्या संख्याविशेषणाने एखादी व्यक्ती किंवा वस्तू यांच्या क्रमांकाचा बोध होतो, त्या संख्याविशेषणाला 'क्रमवाचक विशेषण' असे म्हणतात.
काही क्रमवाचक विशेषणे
मराठी व्याकरणातील काही क्रमवाचक विशेषणे -
| पहिला | दुसरा | तिसरा | चौथा |
| पाचवा | सहावा | सातवा | आठवा |
वाक्यातील उपयोग
क्रमवाचक विशेषणाचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
- विवेकचा वर्गामध्ये दुसरा क्रमांक आला.
या वाक्यामध्ये विवेकच्या क्रमांकाविषयी अधिक माहिती देण्यासाठी 'दुसरा' हे क्रमवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. २
- धोनी आज पाचव्या क्रमांकावर खेळणार आहे.
या वाक्यामध्ये धोनीच्या खेळातील क्रमांकाविषयी अधिक माहिती देण्यासाठी 'पाचव्या' हे क्रमवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. ३
चंद्रावर जाणारा नील आर्मस्ट्रॉंग हा जगातील पहिला मनुष्य होता.
या वाक्यामध्ये नील आर्मस्ट्रॉंगच्या चंद्रावर जाण्याच्या क्रमांकाविषयी अधिक माहिती देण्यासाठी 'पहिला' हे क्रमवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.