पृथकवाचक विशेषण

विशेषणाचे प्रकार

ज्या संख्याविशेषणाने एखाद्या संख्येची अथवा वस्तूची किती वेळा 'आवृत्ती' झाली आहे हे दर्शविले जाते, त्या संख्याविशेषणाला 'आवृत्तीवाचक विशेषण' असे म्हणतात.

'पृथकवाचक विशेषण' म्हणजे काय?

'पृथकवाचक विशेषण' म्हणजे काय?

जे संख्याविशेषण त्याचा मूळ अर्थ न दर्शविता वेगळ्या अर्थाचा बोध करून देते, त्या संख्याविशेषणाला 'पृथकवाचक विशेषण' असे म्हणतात.

पृथकवाचक विशेषणामध्ये एकच 'गणनावाचक विशेषण' दोन वेळा वापरलेले असते.

काही पृथकवाचक विशेषणे

मराठी व्याकरणातील काही पृथकवाचक विशेषणे -

एक-एक दोन-दोन तीन-तीन चार-चार
वाक्यातील उपयोग

पृथकवाचक विशेषणाचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १
  • वार्षिक स्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांचे पाच-पाच गट करावयाचे आहेत.

या वाक्यामध्ये विद्यार्थ्यांचे 'पाच-पाच' गट करावयास सांगितले आहेत.

पाच-पाच असे दोन वेळा सांगितल्यामुळे त्यामधून वेगळा अर्थबोध होतो.

उदाहरण क्र. २
  • प्रत्येक गटातून तीन-तीन मुले पुढे या.

या वाक्यामध्ये 'तीन-तीन' मुलांना पुढे येण्यास सांगितले आहेत.

तीन-तीन असे दोन वेळा सांगितल्यामुळे त्यामधून वेगळा अर्थबोध होतो.

उदाहरण क्र. ३
  • खालीलपैकी प्रत्येकी चार-चार प्रश्न सोडवणे बंधनकारक आहे.

या वाक्यामध्ये 'चार-चार' प्रश्न सोडविण्यास सांगितले आहेत.

चार-चार असे दोन वेळा सांगितल्यामुळे त्यामधून वेगळा अर्थबोध होतो.

आवृत्तीवाचक विशेषण अनिश्चित विशेषण

This educational article was first posted on and last updated on by