आवृत्तीवाचक विशेषण म्हणजे काय?
ज्या संख्याविशेषणाने एखाद्या संख्येची अथवा वस्तूची किती वेळा आवृत्ती झाली आहे हे दर्शविले जाते, त्या संख्याविशेषणाला आवृत्तीवाचक विशेषण असे म्हणतात.
मराठी व्याकरणातील काही आवृत्तीवाचक विशेषणे –
दुप्पटतिप्पटचौपटपाचपटसहापटदहापटदुहेरीतिहेरी
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
काल मी दुप्पट अभ्यास केला.
या वाक्यामध्ये अभ्यास करण्याची आवृत्ती दर्शविण्यासाठी दुप्पट हे आवृत्तीवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. २
त्या साडीला दुहेरी रंग आहे.
या वाक्यामध्ये रंगाची आवृत्ती दर्शविण्यासाठी दुहेरी हे आवृत्तीवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. ३
मी आज चौपट खरेदी केली आहे.
या वाक्यामध्ये किती खरेदी केली याची आवृत्ती दर्शविण्यासाठी चौपट हे आवृत्तीवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.