गुणवाचक विशेषण

विशेषणाचे प्रकार

मराठी वाक्यामध्ये एखाद्या नामाचा विशेष गुण दर्शविण्यासाठी ज्या विशेषणाचा उपयोग केला जातो, त्याला 'गुणवाचक विशेषण' असे म्हणतात.

'गुणवाचक विशेषण' म्हणजे काय?

'गुणवाचक विशेषण' म्हणजे काय?

मराठी वाक्यामध्ये एखाद्या नामाचा विशेष गुण दर्शविण्यासाठी ज्या विशेषणाचा उपयोग केला जातो, त्याला 'गुणवाचक विशेषण' असे म्हणतात.

काही गुणवाचक विशेषणे

मराठी व्याकरणातील काही गुणवाचक विशेषणे -

सुंदर कुरूप धाडसी भित्रा
लालभडक हिरवेगार उंच बुटका
वाक्यातील उपयोग

गुणवाचक विशेषणाचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १
  • गोरक्ष धाडसी मुलगा आहे.

या वाक्यामध्ये गोरक्ष या मुलाच्या स्वभावाविषयी (गुणाविषयी) अधिक माहिती देण्यासाठी 'धाडसी' हे गुणवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.

उदाहरण क्र. २
  • बागेत गुलाबाची पांढरी फुलं आहेत.

या वाक्यामध्ये गुलाबाच्या फुलांच्या रंगाविषयी (गुणाविषयी) अधिक माहिती देण्यासाठी 'पांढरी' हे गुणवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.

उदाहरण क्र. ३
  • भिंतीवरील चित्र सुंदर आहे.

या वाक्यामध्ये चित्राचे वर्णन करण्यासाठी 'सुंदर' हे गुणवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.

उदाहरण क्र. ४
  • त्या डोंगराच्या पलीकडे हिरवेगार रान.

या वाक्यामध्ये रानाच्या गुणाविषयी अधिक माहिती देण्यासाठी 'हिरवेगार' हे गुणवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.

विशेषण म्हणजे काय? संख्यावाचक विशेषण

This educational article was first posted on and last updated on by