सार्वनामिक विशेषण म्हणजे काय?
मराठी भाषेतील कोणत्याही सर्वनामापासून तयार होणाऱ्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.
मराठी व्याकरणातील काही सार्वनामिक विशेषणे –
माझामाझीमाझेमाझ्यातुझातुझीतुझेतुझ्यात्याचात्याचीत्याचेत्याच्यातिचातिचीतिचेतिच्या
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
सगळं सामान माझ्या पिशवीत ठेवलं आहे.
या वाक्यामध्ये मी या सर्वनामापासून बनलेले माझ्या हे सार्वनामिक विशेषण वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. २
तिचे घर खूप सुंदर आहे.
या वाक्यामध्ये ती या सर्वनामापासून बनलेले तिचे हे सार्वनामिक विशेषण वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. ३
त्याचा मुलगा सध्या दहाव्या इयत्तेत शिकत आहे.
या वाक्यामध्ये तो या सर्वनामापासून बनलेले त्याचा हे सार्वनामिक विशेषण वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. ४
आयकर विभागाने त्यांची सर्व मालमत्ता जप्त केली आहे.
या वाक्यामध्ये ते या सर्वनामापासून बनलेले त्यांची हे सार्वनामिक विशेषण वापरण्यात आले आहे.