शब्द म्हणजे काय?
शब्द म्हणजे काय?
दोन किंवा दोनापेक्षा अधिक अक्षरे एकत्र आल्यानंतर जर त्या अक्षरांच्या समूहाला निश्चित असा अर्थ प्राप्त होत असेल, तर त्या समूहाला 'शब्द' असे म्हणतात.
याचाच अर्थ असा की ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल, तर त्या समूहाला 'शब्द' असे म्हणतात.
अर्थपूर्ण शब्द
अर्थपूर्ण शब्द
अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अक्षरांचा क्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.
शब्दाचा अर्थ समजण्यासाठी अक्षरं योग्य क्रमाने आली पाहिजेत.
उदाहरणार्थ,
- 'कमळ' हा एक शब्द आहे.
- 'चेहरा' हा एक शब्द आहे.
- 'पंकज' हा एक शब्द आहे.
- 'वस्तू' हा एक शब्द आहे.
- 'दर्शनीय' हा एक शब्द आहे.
वरील उदाहरणांतील 'कमळ' हा अक्षरांचा समूह जर 'मकळ' असा लिहिला तर त्याला काहीच अर्थ प्राप्त होत नाही. त्यामुळे 'मकळ' या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणता येणार नाही.
त्याचप्रमाणे, 'चेहरा' हा अक्षरांचा समूह जर 'हचेरा' असा आला तर तो अर्थहीन होतो. त्यामुळे 'हचेरा' या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणता येणार नाही.
शब्दसंपत्ती
शब्दसंपत्ती
'शब्दसंपत्ती' या विषयामध्ये दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे असतात.
शब्दसंपत्तीचे काही नियम पुढीलप्रमाणे आहेत -
- दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे.
- अक्षरांना कुठेही अतिरिक्त काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार असू नये.
- तयार केलेल्या शब्दाला अर्थ असणे आवश्यक आहे.