'विशेषनाम' म्हणजे काय?
'विशेषनाम' म्हणजे काय?
ज्या नामातून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होतो, त्या नामाला 'विशेषनाम' असे म्हणतात.
विशेषनामाची वैशिष्ट्ये
विशेषनामाची काही वैशिष्ट्ये
- विशेषनाम हे नेहमी 'व्यक्तीवाचक' असते. विशेषनामामुळे जातीचा किंवा प्रकाराचा बोध न होता त्या जातीतील एखादी विशिष्ट व्यक्ती, वस्तू, प्राणी इत्यादींचा अर्थबोध होतो.
- विशेषनाम हे व्यक्तीवाचक असल्यामुळे त्याचे कधीही 'अनेकवचन' होत नाही.
उदाहरणे
विशेषनामाची काही उदाहरणे -
| राम | भीम | गंगा | हिमालय |
| मुंबई | सचिन | गोदावरी | लंडन |
| रायगड | दिल्ली | राजेश | नर्मदा |