भाववाचक नाम म्हणजे काय?
ज्या नामातून एखादी व्यक्ती किंवा प्राणी अथवा वस्तूमधील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो, त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात.
अस्पर्श, अव्यक्त तसेच अदृश्य अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था, कृती इत्यादींच्या नावांना भाववाचक नाम असे म्हणतात.
नियम क्र. १
भाववाचक नाम हे मनातल्या भावाबद्दल माहिती सांगण्याचे काम करतात.
नियम क्र. २
भाववाचक नाम म्हणजे असे नाम ज्याला आपण बघू शकत नाही किंवा ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही.
भाववाचक नामाची काही उदाहरणे –
चांगलावाईटभलाउत्तमकंजूषअहंकारदेवत्वमनोहारीअप्रतिमआनंददुःखहव्यास