प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय?
मराठी वाक्यामध्ये एखादा प्रश्न विचारण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग केला जातो, त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.
मराठी व्याकरणातील काही प्रश्नार्थक सर्वनामे –
कायकोणीकोणालाकुठेकसंकधीकाकेव्हा
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
कोणी मारलं तुला?
या वाक्यामध्ये मारण्याची क्रिया करणारा कोण आहे, हे विचारण्यासाठी कोणी हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. २
काल संध्याकाळी तू कुठे होतास?
या वाक्यामध्ये वाक्याचा कर्ता कोणत्या ठिकाणी होता, हे विचारण्यासाठी कुठे हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. ३
आपण यावर्षी गावाला कधी जाणार आहोत?
या वाक्यामध्ये गावाला जाण्याची वेळ कोणती, हे विचारण्यासाठी कधी हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. ४
त्याने तुला का मारलं?
या वाक्यामध्ये मारण्याचं कारण काय, हे विचारण्यासाठी का हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरण्यात आले आहे.