'दर्शक सर्वनाम' म्हणजे काय?
'दर्शक सर्वनाम' म्हणजे काय?
मराठी वाक्यामध्ये एखादी जवळची किंवा दूरची वस्तू अथवा व्यक्ती दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग केला जातो, त्याला 'दर्शक सर्वनाम' असे म्हणतात.
दर्शक सर्वनामे
मराठी व्याकरणातील दर्शक सर्वनामे
| हा | ही | हे | ह्या |
| तो | ती | ते | त्या |
वाक्यातील उपयोग
दर्शक सर्वनामाचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
- हा माझा मुलगा आहे.
या वाक्यामध्ये जवळ असणाऱ्या मुलाचा उल्लेख करण्यासाठी 'हा' हे दर्शक सर्वनाम वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. २
- तो माझा मित्र आहे.
या वाक्यामध्ये दूर असणाऱ्या मित्राचा उल्लेख करण्यासाठी 'तो' हे दर्शक सर्वनाम वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. ३
- ती माझी छत्री आहे.
या वाक्यामध्ये दूर असणाऱ्या छत्रीचा उल्लेख करण्यासाठी 'ती' हे दर्शक सर्वनाम वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. ४
- हे माझे पुस्तक आहे.
या वाक्यामध्ये जवळ असणाऱ्या पुस्तकाचा उल्लेख करण्यासाठी 'हे' हे दर्शक सर्वनाम वापरण्यात आले आहे.