क्रियापद म्हणजे काय?
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
रोहन शाळेत जातो.
या वाक्यामध्ये जातो या शब्दाने जाण्याची क्रिया दर्शवलेली आहे.
अर्थात, वाक्यातील कर्ता करत असलेली क्रिया दर्शविण्यासाठी जातो हे क्रियापद वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. २
गोरक्ष खो-खो खेळतो.
या वाक्यामध्ये खेळतो या शब्दाने खेळण्याची क्रिया दर्शवलेली आहे.
अर्थात, वाक्यातील कर्ता करत असलेली क्रिया दर्शविण्यासाठी खेळतो हे क्रियापद वापरण्यात आले आहे.
उदाहरण क्र. ३
मी रोज सकाळी व्यायाम करतो.
या वाक्यामध्ये व्यायाम करतो या शब्दांनी व्यायामाची क्रिया दर्शवलेली आहे.
अर्थात, वाक्यातील कर्ता करत असलेली क्रिया दर्शविण्यासाठी व्यायाम करतो हे क्रियापद वापरण्यात आले आहे.