स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय?
मराठी वाक्यामधील जे क्रियाविशेषण क्रिया घडण्याचे स्थान किंवा ठिकाण दर्शविते, त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
परमेश्वर सर्वत्र असतो.
या वाक्यामध्ये क्रिया कुठे घडत आहे, याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी सर्वत्र हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.
सर्वत्र या शब्दामुळे वाक्यातील क्रिया घडण्याचे स्थान समजते.
त्यामुळे, सर्वत्र या शब्दाला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरण क्र. २
इथे खूप शांतता आहे.
या वाक्यामध्ये क्रिया कुठे घडत आहे, याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी इथे हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.
इथे या शब्दामुळे वाक्यातील क्रिया घडण्याचे स्थान समजते.
त्यामुळे, इथे या शब्दाला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरण क्र. ३
आमची मांजर खाली लपली आहे.
या वाक्यामध्ये क्रिया कुठे घडत आहे, याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी खाली हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.
खाली या शब्दामुळे वाक्यातील क्रिया घडण्याचे स्थान समजते.
त्यामुळे, खाली या शब्दाला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरण क्र. ४
माझा भाऊ नदीच्या पलीकडे राहतो.
या वाक्यामध्ये क्रिया कुठे घडत आहे, याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी पलीकडे हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.
पलीकडे या शब्दामुळे वाक्यातील क्रिया घडण्याचे स्थान समजते.
त्यामुळे, पलीकडे या शब्दाला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.