सर्वनाम हा विषय आधी समजून घ्यावा जेणेकरून सर्वनामाचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.
पुरूषवाचक सर्वनाम – विषय सूची
पुरूषवाचक सर्वनाम म्हणजे काय?
मराठी वाक्यामध्ये पुरूषवाचक नामाऐवजी जो शब्द वापरला जातो, त्याला पुरूषवाचक सर्वनाम असे म्हणतात.
पुरूषवाचक सर्वनामाचे पुढीलप्रमाणे एकूण तीन प्रकार पडतात.
१. प्रथम पुरूषवाचक सर्वनाम
नियम क्र. १
वाक्यामध्ये जेव्हा प्रथम पुरुषी सर्वनाम वापरलेले असते, तेव्हा वाक्याचा कर्ता हा स्वतःबद्दल बोलत असतो.
नियम क्र. २
प्रथम पुरूषी कर्ता हा एकवचनी असल्यास तो त्या वाक्यामध्ये फक्त स्वतःचा उल्लेख करतो.
नियम क्र. ३
प्रथम पुरूषी कर्ता हा अनेकवचनी असल्यास तो त्या वाक्यामध्ये स्वतःबरोबर इतरांचाही उल्लेख करतो.
उदाहरणार्थ,
मी उद्या गावाला जाणार आहे.
स्वतःचे काम स्वतः करावे.
आम्ही काल एकत्र अभ्यास केला.
वरील वाक्यांमधील मी, स्वतः ही एकवचनी प्रथम पुरूषी सर्वनामाची उदाहरणे आहेत.
तर, आम्ही हे अनेकवचनी प्रथम पुरूषी सर्वनामाचे उदाहरण आहे.
२. द्वितीय पुरूषवाचक सर्वनाम
नियम क्र. १
वाक्यामध्ये जेव्हा द्वितीय पुरूषी सर्वनाम वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्यामध्ये दुसऱ्या एखाद्या समोर उपस्थित असणाऱ्या व्यक्तीला संबोधून उल्लेख केलेला असतो.
नियम क्र. २
द्वितीय पुरूषी कर्ता हा एकवचनी असल्यास त्या वाक्यामध्ये एकाच व्यक्तीला संबोधून उल्लेख केलेला असतो.
नियम क्र. ३
द्वितीय पुरूषी कर्ता हा अनेकवचनी असल्यास त्या वाक्यामध्ये एकापेक्षा अनेक व्यक्तींना संबोधून उल्लेख केलेला असतो.
उदाहरणार्थ,
तू काही काम करत होतास का?
तुम्ही सर्व आत या.
आपण याविषयी काही बोलणार आहात का?
वरील वाक्यांमधील तू हे एकवचनी द्वितीय पुरूषी सर्वनामाचे उदाहरण आहे.
तर, तुम्ही आणि आपण ही अनेकवचनी द्वितीय पुरूषी सर्वनामाची उदाहरणे आहेत.
३. तृतीय पुरूषवाचक सर्वनाम
नियम क्र. १
वाक्यामध्ये जेव्हा तृतीय पुरूषी सर्वनाम वापरलेले असते, तेव्हा त्या वाक्यामध्ये तिसऱ्या एखाद्या समोर उपस्थित नसलेल्या व्यक्तीला संबोधून उल्लेख केलेला असतो.
नियम क्र. २
तृतीय पुरूषी कर्ता हा एकवचनी असल्यास त्या वाक्यामध्ये एकाच व्यक्तीला संबोधून उल्लेख केलेला असतो.
नियम क्र. ३
तृतीय पुरूषी कर्ता हा अनेकवचनी असल्यास त्या वाक्यामध्ये एकापेक्षा अनेक व्यक्तींना संबोधून उल्लेख केलेला असतो.
उदाहरणार्थ,
ती रोज संध्याकाळी बागेमध्ये फिरायला जाते.
तो कालपासून खूप आजारी आहे.
त्या सर्व मुली खूप हुशार आहेत.
त्यांनी काल सर्व घराची साफसफाई केली.
वरील वाक्यांमधील ती आणि तो ही एकवचनी तृतीय पुरूषी सर्वनामाची उदाहरणे आहेत.
तर, त्या आणि त्यांनी ही अनेकवचनी तृतीय पुरूषी सर्वनामाची उदाहरणे आहेत.
पुरूषवाचक सर्वनामे
पुरूष | एकवचनी सर्वनामे | अनेकवचनी सर्वनामे |
---|---|---|
प्रथम पुरूष | मी स्वतः |
आम्ही |
द्वितीय पुरूष | तू | तुम्ही आपण |
तृतीय पुरूष | तो ती ते त्याला तिला |
ते त्या ती त्यांना |