शब्दयोगी अव्यय म्हणजे काय?

मराठी वाक्यामधील जो शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतो आणि त्यांचा वाक्यातील इतर शब्दाशी असलेला संबंध दर्शवितो, त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

शब्दयोगी अव्ययाची काही वैशिष्ट्ये

  • शब्दयोगी अव्यय स्वतंत्र असा शब्द नाही.
  • शब्दयोगी अव्यय हे एखादे नाम किंवा सर्वनाम याला जोडून आलेले असते.
  • यांमध्ये मागे, पुढे, बाहेर, वर, खाली, पेक्षा, समोर, पूर्वी हे शब्द मुख्यतः जोडले जातात.
  • लिंग, वचन, विभक्ती किंवा पुरूष जरी बदलले, तरी शब्दयोगी अव्ययांच्या स्वरूपात बदल होत नाही.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

समईखाली फूल पडले आहे.

वरील वाक्यात ‘खाली’ हा शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून वापरलेला असून ‘समई’ या शब्दाला तो जोडलेला आहे.

या वाक्यामध्ये ‘खाली’ हे शब्दयोगी अव्यय ‘समई’ आणि ‘फूल’ या दोन शब्दांना जोडण्याचे काम करत आहे.

उदाहरण क्र. २

घरासमोर तुळस आहे.

वरील वाक्यात ‘समोर’ हा शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून वापरलेला असून ‘घर’ या शब्दाला तो जोडलेला आहे.

या वाक्यामध्ये ‘समोर’ हे शब्दयोगी अव्यय ‘घर’ आणि ‘तुळस’ या दोन शब्दांना जोडण्याचे काम करत आहे.

उदाहरण क्र. ३

सरिता भारतीपेक्षा उंच आहे.

वरील वाक्यात ‘पेक्षा’ हा शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून वापरलेला असून ‘भारती’ या शब्दाला तो जोडलेला आहे.

या वाक्यामध्ये ‘पेक्षा’ हे शब्दयोगी अव्यय ‘सरिता’ आणि ‘भारती’ या दोन शब्दांना जोडण्याचे काम करत आहे.

उदाहरण क्र. ४

चिमणी पिलांसाठी चारा टिपत होती.

वरील वाक्यात ‘साठी’ हा शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून वापरलेला असून ‘पिल्लं’ या शब्दाला तो जोडलेला आहे.

या वाक्यामध्ये ‘साठी’ हे शब्दयोगी अव्यय ‘चिमणी’ आणि ‘चारा’ या दोन शब्दांना जोडण्याचे काम करत आहे.

उदाहरण क्र. ५

रोहित झाडामागे लपला होता.

वरील वाक्यात ‘मागे’ हा शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून वापरलेला असून ‘झाड’ या शब्दाला तो जोडलेला आहे.

या वाक्यामध्ये ‘मागे’ हे शब्दयोगी अव्यय ‘रोहित’ आणि ‘झाड’ या दोन शब्दांना जोडण्याचे काम करत आहे.

शब्दयोगी अव्ययाची इतर काही उदाहरणे

  • पलंगाखाली वाटी पडली आहे.

  • झाडावर पक्षी बसले आहेत.

  • घराबाहेर अंगण आहे.

  • सोनूसाठी खाऊ घेऊन ये.

  • शाळेसमोर देऊळ आहे.

  • माझे घर मंदिरामागे आहे.

This article has been first posted on and last updated on by